नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटशी छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:30 AM2021-01-22T00:30:50+5:302021-01-22T00:32:12+5:30

Tampering Nagpur City Police Commissioner Facebook Account, crime news निर्ढावलेल्या सायबर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या फेसबुक अकाउंटशी छेडछाड केली. गुरुवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

Tampering with Nagpur City Police Commissioner's Facebook Account | नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटशी छेडछाड

नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटशी छेडछाड

googlenewsNext

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर - निर्ढावलेल्या सायबर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या फेसबुक अकाउंटशी छेडछाड केली. गुरुवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीला हुडकून काढण्यासाठी तपासचक्रे फिरविण्यात आली आहेत.चार महिन्यांपूर्वी नागपुरात रुजू झालेल्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अल्पावधीतच अनेक कुख्यात गुन्हेगारांसह पांढरपेश्या गुन्हेगारांवरही आपला वचक निर्माण केला आहे. गुन्हेगारांना कोणत्याच स्थितीत मोकळे सोडायचे नाही, अशी त्यांची भूमिका आहे. गुंड आणि त्यांना मोठे करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठीही त्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ड्रग माफिया, भूमाफिया तसेच रेती माफियांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी त्यांनी विशेष ॲक्शन प्लान सुरू केला असून शहरातील बुकी, हवालावाल्यांसोबतच कायद्याशी खेळू पाहणाऱ्या मोहब्बतसिंग तुलीसारख्या बड्या उद्योजकांवरही महिनाभरात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील वाढत्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी त्यांनी काही खास उपाययोजना आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करायची असतानाच सायबर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्तांच्याच फेसबुक अकाउंटशी छेडछाड केल्याचे आज उघड झाले आहे. स्वत: टेक्नोसॅव्ही असलेल्या अमितेशकुमार यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याची लगेच दखल घेत हा निर्ढावलेपणा दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला शोधण्यासाठी तपासचक्रे गतिमान केली.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी

या संबंधाने लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार खरा असल्याचे त्यांनी सांगितले. याची आपण गंभीर दखल घेतली असून गुन्हेगाराला लवकरच शोधून काढू असे ते म्हणाले. दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे ते म्हणाले. आपल्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून कुणाला मेसेज अथवा फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर ती ग्राह्य धरू नये, असेही आवाहन अमितेशकुमार यांनी केले.

Web Title: Tampering with Nagpur City Police Commissioner's Facebook Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.