जलकुंभांचे काम रखडल्याने टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:49+5:302021-09-08T04:11:49+5:30
डिसेंबर २०२० पर्यंत शहरातील नॉननेटवर्क भागातील चार जलकुंभांचे बांधकाम पूर्ण करून पाणीपुरवठा अपेक्षित होता. परंतु जलकुंभांची कामे रखडल्याने मनपाला ...
डिसेंबर २०२० पर्यंत शहरातील नॉननेटवर्क भागातील चार जलकुंभांचे बांधकाम पूर्ण करून पाणीपुरवठा अपेक्षित होता. परंतु जलकुंभांची कामे रखडल्याने मनपाला टँकरवर खर्च करावा लागत आहे. त्यात टँकर लॉबीच्या दबावात गरज नसतानाही टँकरच्या फेऱ्या वाढविल्या जात आहेत. यामुळे मनपावर ८ ते १० कोटींचा बोजा वाढला आहे.
..
टँकर लॉबीत नगरसेवक सहभागी
दीड वर्षापूर्वी १२० टँकर बंद करण्यात आले. आता त्याच भागात पुन्हा टँकर वाढविण्यासाठी प्रशासनावर टँकर लॉबीकडून दबाव आणला जात आहे. यात काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचाही सभावेश आहे. यामुळे अधिकारी कोंडीत सापडले आहेत.
...
दीड वर्षापूर्वी सुरू असलेले टँकर -३४६
टँकरवर होणारा खर्च -२८ ते ३० कोटी
सध्या सुरू असलेले टँकर -२६४
टँकरवर होणारा खर्च २० ते २२ कोटी
१२० टँकर बंद केल्यानंतर बचत- १० ते १२ कोटी
....