सावनेर शहरात टॅंकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:08+5:302021-06-19T04:07:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खापा पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खापा पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांची हाेणारी गैरसाेय दूर करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने टॅंकरने पाणीपुरवठा करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक पाणी घेण्यासाठी टॅंकरजवळ गर्दी करीत असल्याचेही दिसून येते.
सावनेरवासीयांना सतत पाणीटंचाईला सामाेरे जावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात ही पाणीसमस्या उग्र रुप धारण करायची. यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनाने खापा पंप हाऊसची निर्मिती केली. साेबतच सावनेर-खापा मार्गालगतच्या सर्वाेदयनगर व अवधूत वाडी येथे दाेन प्रत्येकी एक असे दाेन फिल्टर प्लांट तयार करण्यात आले. साेबतच पाण्याच्या याेग्य वितरणासाठी टाक्याही बांधण्यात आल्या. त्यामुळे या समस्येची तीव्रता कमी झाली.
मात्र, खापा पंप हाऊसच्या पाचवीला पुजलेला तांत्रिक बिघाड कमी व्हायला तयार नाही. शिवाय, ही समस्या कायमस्वरुपी साेडविण्यात पालिका प्रशासनाला यश येत नाही. त्यामुळे मुबलक पाणी असतानाही सावनेरवासीयांना पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागते. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून, यावर कामयस्वरुपी ताेडगा काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
...
रेतीमुळे डाेकेदुखी वाढली
सावनेर शहराला कन्हान नदीवरील खापा पंप हाऊसच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाताे. या पंप हाऊसच्या निर्मितीसाठी नगर पालिका प्रशासनाने काेट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, या पंप हाऊसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण हाेत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पंप हाऊसमध्ये वारंवार रेती शिरत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.