नागपूरनजीकच्या हिंगणा भागात डांबर ड्रम ब्लास्ट, चार मजूर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:19 AM2018-12-25T00:19:35+5:302018-12-25T00:23:41+5:30

रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करतांना एका डांबराच्या ड्रममध्ये ब्लास्ट झाल्याने ४ मजूर गंभीरपणे भाजल्या गेले. ही गंभीर घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता हिंगणा येथील टीसीएस शाळेसमोरील रस्त्यावर घडली.

Tar coal drum blast, four laborers seriously injured in Hingna area of Nagpur | नागपूरनजीकच्या हिंगणा भागात डांबर ड्रम ब्लास्ट, चार मजूर गंभीर जखमी

नागपूरनजीकच्या हिंगणा भागात डांबर ड्रम ब्लास्ट, चार मजूर गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देटीसीएस शाळेसमोर घडली घटनाडांबर गरम करतांना वॉल न उघडल्याने दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करतांना एका डांबराच्या ड्रममध्ये ब्लास्ट झाल्याने ४ मजूर गंभीरपणे भाजल्या गेले. ही गंभीर घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता हिंगणा येथील टीसीएस शाळेसमोरील रस्त्यावर घडली.
सुखराम विश्वकर्मा (३५), चैनसिंह धुर्वे (३५), लखनलाल धुर्वे (३०) आणि मुरारी तेजसिंग कुंभरे (२५) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. ते डांबर गरम करणाऱ्या चुलीजवळच काम करीत होते. ड्रम ब्लास झाल्याने उडालेले डांबर या मजुरांच्या अंगावर उडाले, यात ते गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस शाळेसमोरील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. ठेकेदार श्रीराम वारंगे यांचे मजूर गिट्टी टाकण्यापूर्वी पातळ डांबर टाकण्यासाठी चूल पेटवून डांबराचे ड्रम गरम करीत होे. दोन ड्रम जवळ ठेवून लाकडाच्या चुलीवर डांबराचे सीलबंद ड्रम गरम केले जात होते. सूत्रानुसार डांबर गरम करण्यापूर्वी ड्रमचे सील किंवा वॉल उघडावा लागतो. त्यानंतरच तो गरम करावा लागतो. परंतु वॉल न उघडताच ड्रम चुलीवर ठेवण्यात आले. त्यामुळे खूप गरम झालेले ड्रम ब्लास्ट झाले. ड्रम अचानक फाटल्याने त्यातील गरम डांबर उडाले. ते सुखरामच्या हातावर, चैनसिंह हातावर तर लखन आणि मुरारीच्या चेहऱ्यावर व हातावर पडल्याने ते यात गंभीरपणे भाजल्या गेले. या घटनेमुळे मजूर इकडे तिकडे पळू लागले. अग्नीशमन दलाला लगेच सूचना देण्यात आली. जखमींना वानाडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे जखमीचा उपचार सुरु आहे.
तर दुसरा ड्रमही फाटला असता
अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनुसार जेव्हा अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले. तेव्हा दुसरा ड्रमही चुलीवर गरम होत होता. उकळत असलेल्या डांबराच्या ड्रमवर पाणी टाकून तो थंडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चूल विझल्याने आणि पाणी टाकल्याने तो बºयाच प्रमाणात थंड झाला. तेव्हा ड्रममध्ये छिद्र करण्यात आले. अन्यथा दुसरा ड्रमही ब्लास्ट झाला असता.

 

Web Title: Tar coal drum blast, four laborers seriously injured in Hingna area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.