जेबुन्निसा शेख, कल्पना शास्त्री यांना ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:10 AM2021-09-14T04:10:19+5:302021-09-14T04:10:19+5:30
नागपूर : आकांक्षा मासिकातर्फे स्व. प्रभावतीताई सबाने स्मृती ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे ...
नागपूर : आकांक्षा मासिकातर्फे स्व. प्रभावतीताई सबाने स्मृती ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पुरस्कार उमरेडच्या जेबुन्निसा शेख व नागपूरच्या कल्पना शास्त्री यांना जाहीर करण्यात आले आहेत.
जेबुन्निसा शेख या मोफत कौटुंबिक समुपदेशन देण्यासोबतच, गोरगरीब व दुर्बल घटकातील महिलांना मोफत जगण्याचे सामर्थ्य देत असतात. जाती तोडो, समाजा जोडो हे अभियान त्यांनी चालविले असून, घरेलू महिला कामगार संघटना, महिला सुरक्षा समिती, जनहित संघर्ष समितीसारख्या विविध संघटना चालवितात. कल्पना शास्त्री या मूळच्या वर्धा येथील असून, वयाच्या १७व्या वर्षापासून गांधीवादी विचाराने सामाजिक कार्य करत आहेत. बिहारसारख्या राज्यात दलित वर्गातील महिलांसाठी त्याचे कार्य मोलाचे ठरते. महिला सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ते कार्य करत आहेत. कल्पना शास्त्री यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहे.
स्व. प्रभावतीताई सबाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची सुरुवात माहेर संस्थेच्या अध्यक्ष, आकांक्षा मासिकाच्या संपादक, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरुणा सबाने यांनी २०१८ पासून केली. पहिला पुरस्कार उल्का महाजन यांना प्रदान करण्यात आला, तर २०१९-२०चा हा पुरस्कार जेबुन्निसा शेख व २०२०-२१चा हा पुरस्कार कल्पना शास्त्री यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
...............