ओळखीतील विखारी नजरांतून ‘टार्गेट’

By admin | Published: September 10, 2015 03:39 AM2015-09-10T03:39:42+5:302015-09-10T03:39:42+5:30

महाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे.

"Target" | ओळखीतील विखारी नजरांतून ‘टार्गेट’

ओळखीतील विखारी नजरांतून ‘टार्गेट’

Next

बलात्काराचे प्रमाण वाढले :‘टीनएजर्स’ धोक्यात
योगेश पांडे नागपूर
महाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे. ‘टीनएजर्स’ मुलींवरील बलात्काराची देशातील सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रातच नोंदविण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे जवळपास ९८ टक्के घटनांमध्ये आरोपी ही ओळखीतीलच व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) अहवालातील आकडेवारीतून हे काळे चित्र समोर आले आहे.
२०१४ या वर्षात राज्यामध्ये ३ हजार ४३८ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. यातील १ हजार ७२४ बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर झाले आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयातील लेकींवरदेखील हिंस्त्र मनोवृत्तीच्या नराधमांची नजर पडत आहे. मुलींचे आयुष्य उद््ध्वस्त करणारे बहुतांश नराधम हे अनोळखी व्यक्ती नसून नाते-संबंध अन् नेहमीच्या परिचयातीलच आहेत. एकूण प्रकरणांपैकी ३ हजार ३८३ प्रकरणांत आरोपी ओळखीतील व्यक्तीच आहे. यात अगदी अगदी वडील, भाऊ यांसारख्या रक्तातील नात्यांपासून ते जवळील नातेवाईक, शेजारी, परिचित इत्यादींचा समावेश आहे. २०१३ च्या तुलनेतदेखील बलात्काराचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१३ साली ३ हजार ६३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१२ साली हेच प्रमाण १ हजार ८३९ इतके होते.
‘टीनएजर्स’वर विखारी नजरा
२०१४ सालातील ३ हजार ५३८ पैकी १ हजार ९६ बलात्कार हे लहान बालिका व ‘टीनएजर्स’ यांच्यावर झालेले आहेत. यात ६ वर्षांखालील मुलींची संख्या ही ११२ इतकी आहे. ६ ते १२ या वयोगटातील २५३ मुलींवर बलात्कार झाला. देशभरात १६ वर्षांपर्यंतच्या मुलींवरील बलात्काराचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रातच आहे.

Web Title: "Target"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.