उद्दिष्ट ठरवून मोहीम राबवा
By admin | Published: August 4, 2014 12:51 AM2014-08-04T00:51:50+5:302014-08-04T00:51:50+5:30
प्रत्येक झोनमध्ये सर्वे करून फू टपाथ व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची यादी तयार करा. मंगल कार्यालय व लॉन मालकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे
आयुक्तांचे निर्देश : अतिक्र मण आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
नागपूर : प्रत्येक झोनमध्ये सर्वे करून फू टपाथ व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची यादी तयार करा. मंगल कार्यालय व लॉन मालकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे की नाही याची शहानिश करा. जागा न सोडलेल्या मालकांना नोटीस बजावा. उद्दिष्ट ठरवून अतिक्र मण कारवाई न करणाऱ्या सहायक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी शनिवारी आढावा बैठकीत दिला.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्धने यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे.
समितीच्या बैठकीत शहरातील अतिक्र मण कारवाईचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये सहायक आयुक्तांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कारवाई करू, अशी तंबी वर्धने यांनी दिली.
तसेच प्रत्येक झोनधील गॅरेज, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या गाड्या, याची माहिती घेऊन गॅरेज मालकांकडे आस्थापना परवाना नसल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त भरत तागडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, नासुप्रचे जनरल मॅनेजर मिलिंदकुमार साळवे, नगररचना विभागाचे सहायक संचालक सतीश रेंगे, अतिक्र मण नियंत्रण अधिकारी दिलीप जामगडे, झोनचे सहाय्यक आयुक्त जी.एम. राठोड, राजेश कराडे, विजय हुमने, सुभाष जयदेव, महेश मोरोणे, राजू भिवगडे, अशोक पाटील, हरीश राऊ त, प्रकाश वराडे, उपविभागीय अभियंता एम.जी.कुकरेजा, सहायक अभियंता के.एस.ईखार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)