नागपुरात  टॅक्स वसुलीला फटका पण नगररचनाने तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:05 PM2020-04-01T22:05:58+5:302020-04-01T22:06:29+5:30

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या टॅक्स व पाणीपट्टी वसुलीला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.

Tax collections in Nagpur hit, but Town planing saves! | नागपुरात  टॅक्स वसुलीला फटका पण नगररचनाने तारले!

नागपुरात  टॅक्स वसुलीला फटका पण नगररचनाने तारले!

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे टॅक्स वसुली २४० कोटीवर थांबली : नगररचना १९६ कोटी तर पाणीपट्टीची १४० कोटींची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या टॅक्स व पाणीपट्टी वसुलीला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. मालमत्ता करापासून मार्च अखेरीस २६० ते २७० कोटींची वसुली अपेक्षित होती. त्यानुसार विभाग कामाला लागला होता. परंतु मागील १५ दिवसात टॅक्स वसुली मोहीम राबविता न आल्याने वसुली २४० कोटीं पर्यंतच पोहचली आहे. पाणीपट्टीचे १६० कोटींचे उद्दिष्ट असताना १४० कोटींची वसुली झाली. मात्र नगररचना विभागाने तारले आहे. ९३.२७ कोटींचे उद्दिष्ट असताना वसुली १९५.६८ कोटी झाली आहे. यामुळे आर्थिक संकटातील मनपाला थोडा दिलासा मिळाला आहे.आयुक्तांनी सुधारित अर्थसंकल्पात वसुलीसाठी विविध विभागांना उद्दिष्ट दिले होते. दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा होती. मात्र कोरोनाचे संकट डोक्यावर असल्याने कोरोनापासून सुटका हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामी लागली. एरवी मार्च एण्डिंगला सर्व अधिकारी वसुलीच्या कामी लागतात. विशेष पथकही बनविले जाते. मात्र गेल्या १५ दिवसात कोरोनामुळे वसुलीची प्रक्रिया जवळजवळ ठप्प होती. स्थायी समितीने वर्ष २०१९-२० चा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. परंतु उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात उत्पन्न २२५५.०९ कोटी तर खर्च २६९८.३५ अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्तीचे आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली होती. मात्र कोरोनामुळे ही यंत्रणा उपाययोजनांच्या कामाला लागली.३१ मार्च अखेरीस प्रमुख विभागाची उत्पन्नाची आकडेवारी मिळाली आहे. परंतु शासकीय अनुदान व शासकीय विभागांकडील देणी व येणे याचे समायोजन विचारात घेता वित्त वर्षात महापालिकेच्या तिजोरीत नेमका किती महसूल जमा झाला याबाबतची स्थिती स्पष्ट होण्याला तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मालमत्ता करानंतर महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगररचना विभागाकडून ९४.९१ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९५.६८ कोटींचा महसूल जमा झाला. नासुप्रचे शहरातील अधिकार काढल्याने मनपाचा महसूल वाढला आहे. बाजार विभागाला १४४.५१ कोटींचे उद्दिष्ट असताना मार्च अखेरीस ११.६० कोटीचा महसूल जमा झाला. लोककर्म बीओटी प्रकल्पातून ३५ कोटी तर विद्युत विभागामुळे ३०.७५ कोटी मिळण्याची आशा होती. परंतु या विभागांना उद्दिष्ट गाठता आले नाही.
मनपाच्या प्रमुख विभागाचे उत्पन्न (कोटी)मालमत्ता -२४०नगररचना - १९५.६८पाणीपट्टी- १४० बाजार -११.६०

Web Title: Tax collections in Nagpur hit, but Town planing saves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.