टॅक्स विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:03+5:302021-07-22T04:07:03+5:30

५ लाखाहून अधिक थकबाकीदार : जाहीररनामा काढून लिलाव करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचा ...

Tax department on 'Action mode' | टॅक्स विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’

टॅक्स विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’

googlenewsNext

५ लाखाहून अधिक थकबाकीदार : जाहीररनामा काढून लिलाव करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’ आला आहे. ५ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्तांचे बाजारमूल्य ठरवून जाहीरनामा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. थकबाकी न भरल्यास अशा मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

२०२०-२१ या वर्षात कर वसुलीचे उद्दिष्ट ३३२ कोटींचे असले तरी मालमत्ता कराची जुनी थकबाकी तब्बल ९०० कोटी आहे. ५ लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या १९९ मालमत्ता आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. काहींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. मोठ्या थकबाकीदारांत केंद्र व राज्य सरकारच्या काही कार्यालयांचाही समावेश आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे वगळता अन्य थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कर वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मालमत्ता कर वसुलीसाठी करदादात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. परंतु मोठे थकबाकीदार पुढे येताना दिसत नाही. ३० जूनपर्यंत टॅक्स भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्यात आली. परंतु ४५,७९८ करदात्यांनीच याचा लाभ घेतला. आता पुन्हा ५ टक्के सूट दिली जाणार आहे.

....

४.५० लाख डिमांड वाटप

नागपूर शहरात सात लाख मालमत्ताधारक आहेत. काही मनपाच्या रेकॉर्डवर नाहीत. २०२०-२१ या वर्षात ६.४५ लाख मालमत्ताधारकांना २० जुलैपर्यंत डिमांड वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यातील जवळपास ४.५० लाख डिमांड वाटप करण्यात आल्याची माहिती कर आकारणी व कर वसुली विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.

....

तीन झोनकडून न रेकॉर्ड अप्राप्त

झोन कार्यालयांना २० जुलैपर्यंत मालमत्ताधारकांना डिमांड वाटप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज अशा सात झोनमधील ३ लाख मालमत्ताधारकांना डिमांड वाटप करण्यात आल्या. तर लक्ष्मीनगर, आशीनगर व मंगळवारी झोनचा रेकॉर्ड २१ जुलैपर्यंत मुख्यालयाला प्राप्त झाला नव्हता. या तीन झोनमध्ये जवळपास १.२० लाख डिमांड वाटप झाल्याचा अंदाज आहे.

....

असे आहेत मोठे थकबाकीदार

५ लाखांहून अधिक १९९

१ ते ५ लाख २४०१

५० हजार ते १ लाख ५२२४

Web Title: Tax department on 'Action mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.