विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:39 PM2019-05-08T21:39:26+5:302019-05-08T21:40:52+5:30

मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्तारीकरणात दुसरे कॅम्पस दोन वर्षांत सुरू झाल्यानंतर आणखी एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

TCS invests 1000 crores in extension: new employment to thousands of youth | विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार

विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार

googlenewsNext
ठळक मुद्दे३५ कोटींत ५० एकर जमिनीची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्तारीकरणात दुसरे कॅम्पस दोन वर्षांत सुरू झाल्यानंतर आणखी एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लीज कराराचा मसूदा टीसीएसकडे पाठविला आहे. त्यानंतरच करार होणार आहे. पण कंपनीने ७० लाख रुपये एकर दरानुसार ५० एकर जमिनीसाठी ३५ कोटी रुपये अदा केल्यामुळे त्यांना जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. कंपनी तीन महिन्यात विकास कामांना सुरुवात करणार आहे. कंपनीचा पहिल्या टप्प्यातील प्रकल्प ५५ एकर जमिनीवर उभा आहे. त्यामुळे कंपनीकडे १०५ एकर जमीन झाली आहे. सध्या ११ लाख चौरस फूट जागेवर बांधकाम केले आहे.
टीसीएसच्या प्रकल्पात जवळपास १० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. या जागतिक स्तराच्या कंपनीतून मोठ्या कंपन्यांना आयटी सेवा प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये डिजिटल सॉफ्टवेअर विकास, इंजिनिअरिंग, आयओपी, अ‍ॅनालिटिकल, इंडस्ट्री, बिझनेस सोल्युशन आदी सेवांचा समावेश आहे. टीसीएसने पूर्वी पहिल्या टप्प्यातील युनिटची सुरुवात कॉल सेंटर आणि बीपीओद्वारे केली होती.
टीसीएस कंपनीला एल अ‍ॅण्ड टी इन्फोसिसची जागा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमआयएलने ही जागा पूर्वी एल अ‍ॅण्ड टीला दिली होती. पण या कंपनीने अनेक वर्षांनंतरही कामाला सुरुवात न केल्यामुळे एमआयएलने जागा परत घेतली. आता ही जागा टीसीएसला देण्यात आल्यामुळे युवकांना रोजगाराची द्वारे खुली होणार आहे. मिहान-सेझमध्ये आतापर्यंत जवळपास ३५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती आहे. लवकरच सुरु होणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीत युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
टीसीएसला ५० एकर जमिनीचे हस्तांतरण
कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमआयएल) ३५ कोटी रुपये अदा केल्यानंतरच जमिनीचा ताबा देण्यात आला आहे. लीज कराराचा मसूदा कंपनीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता मिळविण्याची शक्यता आहे. कंपनी तीन महिन्यात काम सुरू करणार आहे. या माध्यमातून एक हजार युवकांना रोजगार मिळणार आहे.
सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

Web Title: TCS invests 1000 crores in extension: new employment to thousands of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.