थंड पेयावर ही चहाच भारी : उन्ह असो वा पाऊस की गारठा, नागपूरकरांना चहाचा फुर्का न्यारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 05:45 PM2022-04-15T17:45:57+5:302022-04-15T17:52:21+5:30

चहा विक्रेता एकाच भांड्यात सकाळपासून तोच तो चहा उकळून उकळून व त्यात नवी रसद सातत्याने ओतत असला तरी तो कायम ताजाच असतो, असा एक भाव नागपूरकरांचा आहे

tea love remains in nagpur even in the summer heat wave | थंड पेयावर ही चहाच भारी : उन्ह असो वा पाऊस की गारठा, नागपूरकरांना चहाचा फुर्का न्यारा !

थंड पेयावर ही चहाच भारी : उन्ह असो वा पाऊस की गारठा, नागपूरकरांना चहाचा फुर्का न्यारा !

googlenewsNext
ठळक मुद्दे आम्ही नागपूरकर भारी, चहाची गोडी उन्हाळ्यातही ताजी !

नागपूर : जहर को जहर मारता है और लोहे को लोहा... तसेच उष्णतेला उष्णताच मारते, असा एक आपला नागपूरकरांचा हेका. राज्यात अनेक शहरांमध्ये वाढत्या उन्हाच्या तापामुळे चहाची विक्री घटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नागपुरात तसे काहीच दिसून येत नाही.

भीषण उन्हातून सावली हुडकायची अन् लिंबू पाणी वाला दिसला की घटाघटा एक प्याला घशात ओतून घ्यायचा... हे जरी खरे असले तरी मनाची तृप्ती जाईल तो नागपूरकर कसला? थंड पेयावर ही चहाची हौस कमालीची असल्याने, थाेड्या वेळाने तो चहा टपरी शोधतोच ! चहा विक्रेता एकाच भांड्यात सकाळपासून तोच तो चहा उकळून उकळून व त्यात नवी रसद सातत्याने ओतत असला तरी तो कायम ताजाच असतो, असा एक भाव नागपूरकरांचा आहे आणि अशा भीषण उन्हाळ्यातही तो चहाने आपली उष्णता भागत असल्याचे दिसून येतो.

शहरात आजघडीला २० हजाराच्यावर चहा विक्रेते आहेत. ३० लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात चहा विक्रेत्यांची ही संख्या अपेक्षित आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावल्यानंतर बरेच जण चहा विक्रीकडे वळले, हे सुद्धा त्यामागचे हे कारण आहे. शिवाय, पुणेकरांच्या ‘अमृततुल्य’चे फॅड ही इतके वाढले की छोटेखाली शोरूम सारखे चहाचे हजाराच्या संख्येने हे स्टॉल्सही वाढले आहेत.

हक्काचा रोजगार

चहाची टपरी कुठेही लावा.. अगदी मार्केट पासून ते छोट्याशा गल्लीबोळात ही, ती हमखास चालतेच . चहामध्ये ही आता प्रकार यायला लागले. चहा विक्रीच्या भरवशावर अनेक लोक आपल्या कुटुंबाचे निर्वाहन आरामाने करत असल्याचे दिसून येते.

विक्रीत घट नाहीच

नागपूरकरांच्या जिभेला चहाची चव नसेल तर त्यांचा दिवस खराब जातो, अशी एक म्हण आहे. भर उन्हातही चहाचा घोट घेताना अनेक जण दिसतात. उष्णतेला उष्णतेनेच नामोहरम करायचे, असा हेका नागपूरकरांचा असतो.

दूध खराब होत असल्याने तोटा वाढला

उन्हाळ्यात दूध खराब होण्याची शक्यता दुपटीने वाढते. मात्र, ही बाब दरवर्षीची असल्याने त्याची तयारी चहा विक्रेते करून ठेवतात. चहाचे भांडे हे सतत गॅस, शेगडीवर असते आणि चहा सतत तापत असल्याने ती समस्या तेवढीच जाणवत नाही. शिवाय, बिन दुधाच्या चहाची मागणी कोरोनापासून प्रचंड वाढली आहे.

पारा ४३ अंशांवर

‘ नागपूरचा उन्हाळा ’ जगप्रसिद्ध आहे. यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळीशी गाठली होती आणि एप्रिलमध्ये पारा सलग ४२-४३ अंशावर खेळत आहे. अशात लिंबू पाणी, ताक आदींकडे अनेकांचा ओढा दिसून येतो.

विक्रीत कसलीही घट नाही

चहा विक्रीत कसलीही घट झालेली नाही. दिवसा चहा घेणारे कमी झाले असले तरी सकाळी व संध्याकाळी चहाचा घोट घेणारे हमखास टपरीवर येतातच.

- सचिन जाधव, चहा विक्रेता

Web Title: tea love remains in nagpur even in the summer heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.