गरिबांचा चहा झाला महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:00+5:302021-01-25T04:08:00+5:30
नागपूर : टी बोर्डद्वारे प्रसारित आकड्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यात चहाच्या निर्यातीत ६.७ टक्के वाढ ...
नागपूर : टी बोर्डद्वारे प्रसारित आकड्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यात चहाच्या निर्यातीत ६.७ टक्के वाढ झाली आहे. मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे चहाचे भाव आकाशाला भिडले असून गरिबांचा चहा महाग झाला आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान चहा १८९६.८ लाख किलोग्रॅम निर्यात झालेला आहे. या तुलनेत मागीलवर्षी जवळपास १७८० लाख किलोग्रॅम चहा निर्यात करण्यात आला होता. मूल्य आधारावर चहा निर्यात वाढून ३७२४.३४ कोटी रुपये झाला आहे. हे मूल्य मागील वर्षी ३५५३.१९ कोटी रुपये होते. यावरून चहाचा दर कमी होऊन १९६.३५ रुपये होता. आकड्यानुसार ३७४.६ लाख किलोग्रॅम चहा रशिया येथे निर्यात झाला. इतर प्रमुख आयात करणाऱ्या देशांपैकी इराण २०९.८ लाख किलोग्रॅम, यूएई १४०.८ लाख किलोग्रॅम, अमेरिका ११३ लाख किलोग्रॅम आणि ब्रिटन ११२ लाख किलोग्रॅम या देशांनी भारतीय चहा खरेदी केलेला आहे.
देशांतर्गत चहाची मागणीही चांगली आहे. विविध फ्लेवर जसे विलायची चहा, ग्रीन टी, चॉकलेट चहा आणि इन्स्टंट चहा वापरण्याकडे चहा शौकिनांचा कल दिसतो. ब्रॅण्डेड कंपनीचे भाव ४०० ते ६६० रुपयांपर्यंत गेल्याने गरिबांचा चहा महाग झाला आहे.