‘बायोमेट्रिक’ला शिक्षकांचा विरोध

By admin | Published: October 16, 2016 03:00 AM2016-10-16T03:00:40+5:302016-10-16T03:00:40+5:30

महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Teacher opposes biometrics | ‘बायोमेट्रिक’ला शिक्षकांचा विरोध

‘बायोमेट्रिक’ला शिक्षकांचा विरोध

Next

महापालिक ा : चांगल्या उपक्रमात आडकाठीचा प्रयत्न
नागपूर : महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांमध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याला सुरुवात केली आहे. ज्या शाळांत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे त्या शाळांतील शिक्षक व कर्मचारी वेळेवर यायला लागले आहेत. परंतु काही शाळांतील शिक्षकांकडून या चांगल्या योजनेला विरोध होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नागपूर महापालिकेच्या १८२ शाळा आहेत. सर्वच शाळांत टप्प्याटप्प्याने बायोमेट्रिक यंत्रणा लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली असून लवकरच २५ शाळांत यंत्रणा बसविली जाणार आहे. परंतु काही शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी याला विरोध दर्शविला आहे.
महापालिकेच्या अनेक शाळांतील शिक्षक वेळेवर येत नाही. अनेकदा उपस्थित नसूनही हजेरी बुकात मात्र उपस्थिती दर्शविण्याचा प्रकार शिक्षण समितीच्या निदर्शनास आला होता. याला आळा घालण्यासाठी सर्व शाळांत बायोमेट्रिक प्रणाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुसंख्य शाळांतील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागतही केले आहे. परंतु काही शाळांतील शिक्षकांकडूनच या उपक्रमाला विरोध होत आहे.
डिजिटल कक्षाची निर्मिती, अबॅकस प्रशिक्षण, विज्ञान मेळावा, शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी, स्नेहसंमेलनाचे आयोजन, अटलबिहारी बाजपेयी प्रोत्साहन व विद्या संवर्धन योजना, शाळांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करणे. खेळाचे साहित्य उपलब्ध करणे, गणवेश व शालेय साहित्य व सायकल वाटप करणे बायोमेट्रिक यंत्रणा लावणे असे उपक्रम राबविले जात आहेत. (प्रतिनिधी)

यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिकेला विद्यार्थी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये. त्यांच्या भवितव्याचा विचार करून महापालिकेच्या शाळांतील यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बायोमेट्रिक यंत्रणा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्याच फायद्याची आहे. बहुसंख्य शाळांनी याचे स्वागत केले आहे. काही अपवाद आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच शाळांत ही व्यवस्था केली जाणार आहे.
- गोपाल बोहरे, शिक्षण सभापती, महापालिका

Web Title: Teacher opposes biometrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.