वेध प्रतिष्ठानतर्फे शिक्षक व शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:18+5:302020-12-29T04:09:18+5:30
पारशिवनी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेध प्रतिष्ठानद्वारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना व शाळेला प्रदान करण्यात ...
पारशिवनी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेध प्रतिष्ठानद्वारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना व शाळेला प्रदान करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जि.प.प्राथमिक शाळा, कारला येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटोल पं.स.सभापती धम्मपाल खोब्रागडे होते. जि.प.सदस्य समीर उमप, उपसभापती अनुराधा खराडे, पं.स.सदस्य संजय डांगोरे, वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मनोहर नरांजे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, केंद्रप्रमुख राजू धवड, सरपंच शोभा मोरोलिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल एकटिया प्रामुख्याने उपस्थित होते. ‘शिक्षणतज्ज्ञ जे.पी.नाईक शिक्षक गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ जि.प. प्राथमिक शाळा, कोयनगुडा पं.स.भामरागड जि.प.गडचिरोली येथील विनीत बंडूजी पद्मावार यांना, ‘पूज्य साने गुरुजी शिक्षक गौरव जिल्हास्तरीय पुरस्कार’ मंगला नरेंद्र लांडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पिपळा पं.स.सावनेर) आणि सचिन भीमराव चव्हाण (जि.प. उच्च प्राथमिक शाळा हिवरा पं.स. रामटेक) यांना, वेध प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसाठी असलेला ‘शिक्षणवेध कार्यकर्ता पुरस्कार’ वासंती वसंत गोमासे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा (पडसाळ पं.स.कामठी), जिल्हा परिषद शाळेसाठी असलेला ‘कर्मवीर भाऊराव पाटील जि. प.शाळा गौरव पुरस्कार’ जि.प. प्राथमिक शाळा, कारला पं.स.काटोल या शाळेला वितरित करण्यात आला आहे. शाळेतील मोहन डांगोरे, संजय ताथोडे, वनिता गोरे, अंगणवाडी सेविका कुमुद नौकरिया यांना रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ.अश्विन किनारकर, कीर्ती पालटकर यांनी केले. प्रास्ताविक वेध प्रतिष्ठानचे सचिव खुशाल कापसे यांनी केले. संचालन घनश्याम भडांगे तर आभार राजेंद्र टेकाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकनाथ खजुरीया, धनंजय पकडे, कमलेश सोनकुसळे, संदीप टेंभे, वसंत गोमासे, शंकर जीवनकर, ओंकार पाटील, कृष्णा चावके, कीर्ती पालटकर, वैशाली ठाकरे, राजेश माहूरकर, डॉ. अश्विन किनारकर आदींनी परिश्रम घेतले.