नागपुरात आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर शिक्षकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:54 PM2018-09-05T21:54:01+5:302018-09-05T21:55:14+5:30
महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने बहिष्कार घातला. यामुळे काही निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशासनाला हा कार्यक्रम करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने बहिष्कार घातला. यामुळे काही निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशासनाला हा कार्यक्रम करावा लागला.
सेवाज्येष्ठता यादी तातडीने प्रकाशित करणे, सहाव्या वेतन आयोगाची ५५ महिन्यांची थकबाकी, महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानुसार महागाई भत्त्याची ७२ महिन्यांची थकबाकी, राज्य शासनाप्रमाणे महापालिका शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, मनपा शाळांता १०० टक्के अनुदान द्यावे, मंजूर पदे भरण्यात यावी, सफाई कामगारांना नोकरीत स्थायी करावे, अशा विविध मागण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समिती लढा देत आहे. वारंवार आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याला शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल. १३०० पैकी फक्त ७ शिक्षण प्रशासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशी माहिती मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, देवराव मारोडकर, रंजन नलोडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाºया सात शिक्षकांचे संघटनेतील सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
संविधान चौकात सभा
महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे संविधान चौकात मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू आहे. बुधवारी येथे आयोजित सभेला हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार नागो गाणार सुरेंद्र टिंगणे, राजेश गवरे, जम्मू आनंद आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार जाहीर सभेत करण्यात आला.