नागपुरात चिमुकलीसह शिक्षिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:04 PM2019-02-06T22:04:25+5:302019-02-06T22:05:48+5:30

एका सहा वर्षीय चिमुकलीसह विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीवर आईवडिलांच्या ओळखीच्याच व्यक्तीने तर विधवा शिक्षिकेवर ‘लिव्ह इन-रिलेशन’ अंतर्गत राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केला.

Teachers including the minor girl raped in Nagpur | नागपुरात चिमुकलीसह शिक्षिकेवर अत्याचार

नागपुरात चिमुकलीसह शिक्षिकेवर अत्याचार

Next
ठळक मुद्देजरीपटका-नंदनवन येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सहा वर्षीय चिमुकलीसह विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीवर आईवडिलांच्या ओळखीच्याच व्यक्तीने तर विधवा शिक्षिकेवर ‘लिव्ह इन-रिलेशन’ अंतर्गत राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केला.
पहिली घटना जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत घडली. पीडित सहा वर्षीय मुलीचे आईवडील मजुरी करतात. आरोपी ३० वर्षीय संतोष मरसकोल्हे हा सुद्धा मजुरी करतो. मुलीच्या कुटुंबाशी आरोपी संतोषची ओळख आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता आईवडील कामावर गेल्यानंतर संतोष चिमुकलीच्या घरी आला, आणि तो बळजबरी करू लागला. त्याच वेळी मुलीचा मामा घरी आला. त्याने संतोषला पकडले. संतोषने यापूर्वी सुद्धा तिच्याशी असा प्रकार केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी जरीपटका पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. संतोषने मुलीला याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. त्याच्या धमकीमुळे ती दहशतीत होती. ती अनेक दिवसांपासून अत्याचार सहन करीत होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही संतापले आहेत.
दुसरी घटना ‘लिव्ह इन रिलेशन’ तुटल्यामुळे उघडकीस आली. आरोपी ३५ वर्षीय सौरभ सिंग आहे. सौरभ हा मूळचा अलाहाबाद येथील रहिवासी आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी आहेत. पीडित ४१ वर्षीय शिक्षिका आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. तिला एक मुलगीही आहे. २०११ मध्ये तिची सौरभसोबत ओळख झाली. थोड्यात दिवसात ते एकमेकांच्या जवळ आले. शिक्षिकेच्या तक्रारीनुसार सौरभने तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर ते दोघे नंदनवन परिसरात एकत्र राहू लागले. २०११ पासून गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत सौरभने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपी सौरभ पूर्वी ट्रान्सपोर्टचे काम करीत होता. या कामात नुकसान झाल्याने त्याने ते बंद केले. अलीकडेच सौरभचे अलाहाबाद येथील एका तरुणीसोबत लग्न ठरले. तो शिक्षिकेला न सांगताच लग्न करण्यासाठी निघून गेला. शिक्षिकेला सौरभच्या व्यवहारावरून संशय आला. संपर्क केल्यानंतरही त्याने शिक्षिकेला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Teachers including the minor girl raped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.