शिक्षकांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:15 AM2017-10-24T00:15:47+5:302017-10-24T00:16:02+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या.

Teachers protest against Chief Minister | शिक्षकांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणी

शिक्षकांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यात शिक्षकांना करावी लागणारी सर्वप्रकारची अशैक्षणिक स्वरूपाची आॅनलाईन कामे काढून घ्यावी, ही कामे करण्याकरिता समूह साधन केंद्रावर यंत्रणा उभारावी. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे शिक्षकांमधून १०० टक्के पदोन्नतीवर भरावीत. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्यादी माल व मसाले पदार्थ शासनामार्फत पुरविण्यात यावे, याची व्यवस्था होईस्तव अग्रिम निधी उपलब्ध करून द्यावा. शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतील त्रुटी, अडचणी व त्यातून निर्माण होत असलेला संभ्रम दूर करून बदली प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करावी. यासंदर्भात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष लीलाधर ठाकरे, सचिव सुनील पेटकर, कोषाध्यक्ष मनोज घोडके, समन्वयक राजकुमार वैद्य, जुगलकिशोर बोरकर, टी.वाय. माले, मुरलीधर काळमेघ, प्रबोध धोंगडे, आनंद गिरडकर, मुरलीधर कामडे, प्रमोद लोन्हारे यांच्यासह नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अन्य पदाधिकारी सहभागी होते.

Web Title: Teachers protest against Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.