मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे

By admin | Published: January 12, 2015 01:01 AM2015-01-12T01:01:42+5:302015-01-12T01:01:42+5:30

आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे,

Teaching from mother tongue only | मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे

मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे

Next

मेधा पाटकर : नागो गाणार यांचा सत्कार
नागपूर : आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यक र्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी व्यक्त केले. खासगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे अध्यापक भवन येथे आयोजित आमदार नागो गाणार यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर होते.
राज्यघटनेत शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. परंतु ही जबाबदारी टाळून सरकार श्रीमंतांसाठी शिक्षणाचे खासगीकरण करू पाहात आहे. शिक्षणमाफियांनाही हेच हवे आहे. सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावण्याचा डाव आखला आहे. सरकारी अनुदान वाटपातही भ्रष्टाचार आहे. दुसरकडे समाजाच्या पैशातून चालविण्यात येणाऱ्या शाळांत सुविधा नसल्याच्या कारणावरून त्यांना अनुदान नाकारले जात आहे. शिक्षकांनी कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून हक्कासाठी संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.
खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्राचे बाजारीकरण होत आहे. सर्वच क्षेत्रात विदेशी पैसा व संस्कृती आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या पैशावर शाळा चालविण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण ही मूलभूत गरज समजून सरकारने त्याची जबाबदारी स्वीकारावी. मुख्यमंत्र्यानी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. जात, धर्म बाजूला ठेवून समाजसेवेच्या हेतूने संघटना चालविणाऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पाटकर यांच्या हस्ते नागो गाणार यांना शाल-श्रीफळ व मानपत्र देऊ न त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षणासाठी शाळा असून यातूनच माणूस घडविण्याची प्रक्रिया होत असल्याने शाळा चालल्या पाहिजे. एका कर्तृत्ववान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याकडून माझा सत्कार होत आहे. त्यांच्या प्रेरणेने यापुढेही संघर्ष करीत राहू, असे मनोगत गाणार यांनी व्यक्त केले. प्रमोद रेवतकर यांनीही मार्गदर्शन केले. संघाचे सचिव विजय नंदनवार यांनी प्रास्ताविकातून संघाच्या वाटचालीची माहिती दिली.
विभागाचे संघाचे अध्यक्ष सतीश कटरे, कार्याध्यक्ष सुनील चिचघरे, जिल्हा अध्यक्ष लेकपाल चापले, शहर अध्यक्ष मोहन सोमकुवर, विभागाचे सचिव हेमंत बेलखोडे, जिल्हा सचिव अरुण नवरे व शहर सचिव अतुल टेकोडे आदी उपस्थित होते. संजय बोरगावकर यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Teaching from mother tongue only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.