कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात येणार तज्ञांची चमू : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 02:34 AM2020-08-30T02:34:03+5:302020-08-30T02:36:27+5:30

नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

A team of experts will come to Nagpur to prevent corona outbreak: Home Minister Anil Deshmukh | कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात येणार तज्ञांची चमू : गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात येणार तज्ञांची चमू : गृहमंत्री अनिल देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या तज्ज्ञ चमूमध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह डॉ. ओम श्रीवास्तव (संक्रमक रोग विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावी मुंबईच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.
ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करतील.

Web Title: A team of experts will come to Nagpur to prevent corona outbreak: Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.