‘आयआयएम’ची चमू फेब्रुवारीत येणार
By admin | Published: January 30, 2015 12:53 AM2015-01-30T00:53:42+5:302015-01-30T00:53:42+5:30
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयआयएमची चमू आणि राज्याच्या उच्च तंत्रज्ञान
मिहानची पाहणी करणार :२०० एकर जागेवर स्थापना
नागपुर : मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयआयएमची चमू आणि राज्याच्या उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे अधिकारी नागपुरात येऊन या जागेची पाहणी करणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मिहानमध्ये आयआयएम स्थापनेसाठी २०० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिला आयआयएम असणार आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या निर्देशानंतर जागा निवडीची कवायत पूर्वीच सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि त्यांच्या चमूने व्हीएनआयटी व एलआयटी येथे अस्थायी व्यवस्थापनासाठी पाहणी केली. आयआयएम स्थापनेसाठी विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर २०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संस्थेसाठी नागपुरात इतरत्र एवढी जागा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)