डुक्कर पकडण्यासाठी आले तामिळनाडूचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:32+5:302021-09-02T04:19:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोकाट डुक्कर पकडणारे तामिळनाडूचे पथक नागपुरात दाखल झाले आहे. पहिल्याच ...

A team from Tamil Nadu came to catch the pig | डुक्कर पकडण्यासाठी आले तामिळनाडूचे पथक

डुक्कर पकडण्यासाठी आले तामिळनाडूचे पथक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोकाट डुक्कर पकडणारे तामिळनाडूचे पथक नागपुरात दाखल झाले आहे. पहिल्याच दिवशी बुधवारी त्यांनी धरमपेठ झोन क्षेत्रातील १८ डुक्कर पकडले.

नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, आरटीओ नाला, महाराजबाग परिसरात डुक्कर पकडण्याची कारवाई करण्यात आली. शहरात मोकाट डुकरांचा त्रास वाढल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला फटकारले होते.त्यानंतर २०१९ मध्ये तामिळनाडूहून आलेल्या पथकाने मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम राबविली होती. जवळपास ५०० डुक्कर पकडण्यात आले होते. पकडलेले डुक्कर पथकच घेऊन गेले होते. कोरोना संक्रमणामुळे दीड वर्षात डुक्कर पकडण्याची कारवाई करता आली नाही. मागील काही महिन्यापासून मनपाचा आरोग्य विभाग व तामिळनाडू येथील पथकात नियोजन सुरू होते. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली.

मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलिसांच्या उपस्थितीत पथकाने डुक्कर पकडण्याला सिव्हिल लाईन येथील नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स कार्यालय परिसरातील नाल्यापासून सुरुवात केली.

मोकाट डुकरासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. कोरोना काळात कारवाई करता आली नाही. संक्रमण कमी झाल्याने ही कारवाई हाती घेतली, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

.....

पथकावर हल्ले झाले होते

मागील वेळी डुक्कर पकडण्याची मोहीम राबविताना तामिळनाडूच्या पथकावर हल्ले झाले होते. त्यानंतर एनडीएस जवानांना विशिष्ट प्रकारच्या काठ्या व गुलेर देण्यात आल्या होत्या. यावेळीही पथकाला सतर्क ठेवण्यात आले आहे.

Web Title: A team from Tamil Nadu came to catch the pig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.