पारशिवनीचे तहसीलदार थाेडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:20+5:302021-03-05T04:09:20+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : कार्यालयीन काम आटाेपून रामटेकहून पारशिवनीला परत जात असलेल्या पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे यांच्या कारला ...

Tehsildar of Parshivani rescued Thaedka | पारशिवनीचे तहसीलदार थाेडक्यात बचावले

पारशिवनीचे तहसीलदार थाेडक्यात बचावले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : कार्यालयीन काम आटाेपून रामटेकहून पारशिवनीला परत जात असलेल्या पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे यांच्या कारला भरधाव कंटेनरने मागून जाेरात धडक दिली. त्यामुळे ती कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर गेली तर कंटेनर राेडलगतच्या खड्ड्यात शिरला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर नजीकच्या रामधामसमाेर गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

रामटेक उपविभागीय कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे रामटेकला आले हाेते. त्यांच्या शासकीय वाहनावरील चालकाचे लग्न असल्याने ताे सुटीवर आहे. त्यामुळे ते एमएच-३१/एफई-८८८१ क्रमांकाच्या खासगी कारने रामटेकला आणि बैठक आटाेपल्यानंतर ते याच कारने पारशिवनीला जायला निघाले. ते राष्ट्रीय महामार्गावरील रामधामजवळ पाेहाेचताच मागून वेगात आलेल्या एनएल-०१/एडी-६०६९ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या कारला जाेरात धडक दिली.

या धडकेमुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन सरळ आदळली. यात कारच्या समाेरचे दाेन्ही टायर फुटले. शिवाय, वरुणकुमार सहारे यांच्यासह कारचालकाला थाेडे खरचटले असून, फारशी दुखापत झाली नाही. त्यातच अनियंत्रित कंटेनर सर्व्हिस राेडलगतच्या खड्ड्यात शिरला. वृत्त लिहिस्ताे पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

...

वाहन न आल्याने अनर्थ टळला

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग चाैपदरी असून, २४ तास वर्दळीचा आहे. तहसीलदार वरुणकुमार सहारे यांची कार विरुद्ध लेनवर गेल्यानंतर त्या लेनवर त्यावेळी एकही वाहन आले नाही. त्यामुळे ते व त्यांचा कारचालक सुरक्षित राहिला. शिवाय, कंटेनरची धडक लागल्यानंतर नेमके काय झाले, हे त्यांना व त्यांच्या कारचालकाला कळले नाही.

Web Title: Tehsildar of Parshivani rescued Thaedka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.