सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पाण्याअभावी पिके संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:25+5:302021-08-17T04:14:25+5:30
नागपूर : पिके भरात आली असली तरी संकटात आहेत. पऱ्हाटी पावसाअभावी संकटात आहे. सोयाबीन पिवळे पडायला लागले आहे. ...
नागपूर : पिके भरात आली असली तरी संकटात आहेत. पऱ्हाटी पावसाअभावी संकटात आहे. सोयाबीन पिवळे पडायला लागले आहे. खोडकिडी वाढल्याने आता पाऊस पडणार तरी कधी, अशी आस शेतकऱ्यांना लागली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने चांगलीच दमछाक केली आहे. ऑगस्ट महिन्यातील पाऊस शेतमालासाठी अत्यंत फायद्याचा असतो. मात्र नेमका याच वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, ऑगस्ट महिन्यात फक्त २५ मिमी पाऊस पडला. यामुळे शेती संकटात आली आहे. १ जून ते १६ ऑगस्ट यादरम्यान नागपूर शहरात ६१७.६ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरी ५९६.२ मिमी असतो. आतापर्यंत १०३.२ टक्के पाऊस झाला आहे, तर मान्सूनचा पाऊस ६५ टक्के पडला आहे. जून, जुलै महिन्यातील पावसामुळे ही सरासरी वाढली आहे.
...
१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ५९६.२ मिमी
प्रत्यक्ष झालेला पाऊस - १०३.२ टक्के
...
२) पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)
कापूस - २,१०,५७९.२
भात - ५८,५०५.१
ज्वारी - २,८३७
मका - ३,७६५.५
तूर - ६३,५८४.९५
मूग - ३५१.१
उडीद - १०५२
इतर - १०८
भुईमूग - १,११७.८
तीळ - ५१.२
सोयाबीन - ९२,३३१.४
इतर - ५५
एकूण पेरणी क्षेत्र - ४,३२,८३०.३५
....
३) पाणीसाठा २५ टक्क्यांवर
मोठे - ६१.२१
मध्यम - ६४.००
लघु - ५९.३८
...
उसनवारी कशी फेडणार? (दोन शेतकऱ्यांची प्रतिक्रिया)
१) आधीच आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. नापिकी आणि दुष्काळामुळे मोठे नुकसान मागील वर्षी झाले असताना यंदाही पावसाचा जोर कमी आहे. नापिकी झाली तर कर्ज पुन्हा वाढणार आहे.
- रिकेश टेंभे, खानगाव
२) बँका पुरेसे कर्ज देत नाही. त्यामुळे खाजगी व्यक्तींकडून कर्ज घ्यावे लागते. पीक विम्याची भरपाईही मिळत नाही. मागील वर्षीच्या नापिकीची भरपाईही मिळाली नसताना आता पुन्हा निसर्गाने अपुऱ्या पावसाचे संकट आणलेले दिसत आहे.
- नितीन चालखोर, चेंदकापूर
...
कृषी अधिकाऱ्याचा कोट
हवामान विभागाने या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सरासरी पावसाची टक्केवारी चांगली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला, हे खरे आहे. या आठवड्यातील पाऊस शेतमालासाठी संजीवनी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद शेंडे, अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर
...