तापमान घसरले, नागपुरात पारा १४.७ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 11:24 AM2021-11-01T11:24:26+5:302021-11-01T11:26:09+5:30
नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने घट होऊन ३१ अंशावर पोहोचले. या सोबतच अमरावतीमध्ये १५.२, ब्रह्मपुरी १५.३, बुलडाणा १५.६, गोंदिया १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मागील तीन दिवसांपासून रात्रीच्या तापमानाचा पारा सामान्यापेक्षा ३ अंश सेल्सिअसने खालावल्याची नोंद आहे. यामुळे रात्रीच्या थंडीत वाढ झाल्याचे जाणवत आहे.
रविवारी किमान तापमानाचा पारा ०.३ अंश सेल्सिअसने खालावून १४.७ पर्यंत घसरला होता. यवतमाळमध्ये १४.३ अंश सेल्सिअस अशी सर्वात कमी तापमानाची नोंद विदर्भात झाली, तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर होेते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसा ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण राहील. नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने घट होऊन ३१ अंशावर पोहोचले. या सोबतच अमरावतीमध्ये १५.२, ब्रह्मपुरी १५.३, बुलडाणा १५.६, गोंदिया १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.