तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:36 PM2020-05-12T12:36:02+5:302020-05-12T12:36:22+5:30

जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले.

As the temperature increased, the tripping of electricity increased; Citizens suffer | तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त

तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त

Next
ठळक मुद्देवर्क फ्रॉम होमवरही परिणाम


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले. काही वेळानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरु झाला. गेल्या काही दिवसापासून विजेची ये-जा सुरु आहे.
सातत्याने सुरु असलेल्या विजेच्या या लपंडावामुळे नागरिकांना टी.व्ही., फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण बंद केले जेणेकरून व्होल्टेज कमी जास्त झाल्याने उपकरण खराब होऊ नये. आऊटर रिंगरोडजवळील वस्त्यांमध्ये ही समस्या अधिक आहे. कारण लॉकडाऊन व तापमान वाढल्याने घरगुती विजेची मागणी वाढली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, या दिवसात हवामान बदलत आहे. दिवसा कडक उन्हानंतर अचानक पाऊस पडतो. वादळही येते. याचा परिणाम वितरण यंत्रणेवर पडत आहे. कारण काहीही असो नागरिक त्रस्त आहे. विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी वीज जाण्याच्या भीतीमुळे रात्रीच आपले लॅपटॉप-कॉम्प्युटर चार्ज करून ठेवत आहेत.

कुठलाही रेकॉर्ड नाही
महावितरणकडे अधिकृतपणे ट्रीपिंगचा कुठलाही रेकॉर्ड नाही. सबस्टेशन स्तरावर याची माहिती नोंदवली जाते. महावितरणचे म्हणणे आहे की, हे शक्य नाही. एका डीसीमध्ये ७० ते ८० ट्रान्सफार्मर असतात. ट्रीपिंग दोन ते तीन मिनिटाचे असते. अशा परिस्थितीत डिव्हीजन किंवा झोन स्तरावर रेकॉर्ड ठेवणे कठीण आहे.

 

 

Web Title: As the temperature increased, the tripping of electricity increased; Citizens suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज