नागपुरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:42 PM2021-01-05T23:42:17+5:302021-01-05T23:43:32+5:30

Temperature rise due to cloudy weather , nagpur newsसर्वसाधारणत: जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उपराजधानीत थंडीची हुडहुडी कायम असते. मात्र, यंदा ढगाळ वातावरणामुळे थंडी जाणवत नसल्याचे चित्र आहे.

Temperature rise due to cloudy weather in Nagpur | नागपुरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

नागपुरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सर्वसाधारणत: जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उपराजधानीत थंडीची हुडहुडी कायम असते. मात्र, यंदा ढगाळ वातावरणामुळे थंडी जाणवत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी तापमानात वाढ दिसून आली. दिवस व रात्रीचा पारा अनुक्रमे २.८ अंश सेल्सिअस व २.४ अंश सेल्सिअसने वाढला.

मंगळवारी शहरात कमाल २९.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३ अंशांनी अधिक होते. सकाळी ८.३० वाजता ७२ टक्के आर्द्रता होती. तर पूर्व-उत्तर-पूर्व दिशेते हवा ३.६ किमी वेगाने वाहत होती. हवामान खात्यानुसार हिमालयाच्या भागात ७ जानेवारीला नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे शिवाय मध्य महाराष्ट्रातदेखील वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात ढगाळलेले वातावरण होते.

Web Title: Temperature rise due to cloudy weather in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.