नागपुरात ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:12 AM2021-01-07T00:12:44+5:302021-01-07T00:13:43+5:30
cloudy weather, nagpur news उपराजधानीत तापमान वाढीचा क्रम सुरूच आहे. २४ तासांत नागपुरातील किमान तापमानात १.३ अंश सेल्सिअसची वाढ झाली व १८.३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत तापमान वाढीचा क्रम सुरूच आहे. २४ तासांत नागपुरातील किमान तापमानात १.३ अंश सेल्सिअसची वाढ झाली व १८.३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून तापमान ६ अंशांनी अधिक असल्याने रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव कमी जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशाच प्रकारची स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नागपुरात दिवसादेखील सरासरीहून ३ अंश सेल्सिअस अधिक तापमान होते. सकाळपासून ढग होते. सकाळी साडेआठ वाजता आर्द्रता ७४ टक्के होती. तर सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रमाण ५७ टक्के होते.
दक्षिण अरबी समुद्र व आजूबाजूच्या भागात चक्रीवादळीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रापासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत पट्टा तयार झाला असून यामुळे ढगाळ वातावरण आहे. हिमालयाच्या भागात गुरुवारी नवीन वेस्टर्न डिस्टर्बेंस तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वातावरणावर प्रभाव पडू शकतो.