नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ; मार्च संपायचाच, पारा चाळीशीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 01:58 PM2022-03-16T13:58:05+5:302022-03-16T14:01:07+5:30
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे.
नागपूर : मार्चच्या मध्यातच नागपुरात भीषण उष्णतेने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसाचे कमाल तापमान ३९.६ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासांत पारा २.४ अंशांनी वाढला आहे. सरासरीपेक्षा ४ अंश अधिक असल्याने उष्ण वारे व सूर्यकिरणांनी नागपूरकरांचा त्रास वाढला आहे.
सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या आसपास असेल. तसाही मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पारा ४० अंशांवर पाेहोचून जाताे. मात्र या सीजनमध्ये मार्चच्या मध्यातच या आकड्यावर पाेहोचण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांत कमाल तापमान ३.२ अंशांनी वाढले आहे. येत्या दाेन दिवसांत यामध्ये एक किंवा २ अंशांची वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
मंगळवारी ४१.१ अंश तापमानासह अकाेला विदर्भात सर्वात उष्ण ठरला. याशिवाय वर्धा ४० अंश, अमरावती ३९.८ अंश, ब्रह्मपुरी व चंद्रपुरात ३९.६ अंश, वाशिममध्ये तापमान ३९.५ अंश हाेते. नागपुरात सकाळपासून वातावरण काेरडे हाेते. सकाळी आर्द्रता ४० टक्के हाेती, जी सायंकाळी घसरून २८ टक्क्यांवर पाेहोचली. रात्रीचे तापमान २ अंशांनी वाढून १८.५ अंशांवर चढले.