उपराजधानीतील तापमान घसरले १५.५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 06:30 AM2021-10-23T06:30:00+5:302021-10-23T06:30:02+5:30
Nagpur News काेजागरी पाैर्णिमेनंतर शहराच्या तापमानात घसरण व्हायला लागली आहे. मागील २४ तासांत नागपूरचे तापमान २.२ अंशाने घसरून १५.५ अंशावर पाेहोचले.
नागपूर : काेजागरी पाैर्णिमेनंतर शहराच्या तापमानात घसरण व्हायला लागली आहे. मागील २४ तासांत नागपूरचे तापमान २.२ अंशाने घसरून १५.५ अंशावर पाेहोचले. पारा सामान्यपेक्षा ४ अंश कमी असल्याने हलक्या थंडीची जाणीव व्हायला लागली आहे. शुक्रवारी नागपूरचे तापमान विदर्भात सर्वात कमी हाेते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. शिवाय, वातावरण काेरडे असल्याने तापमान सामान्यपेक्षा खाली राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान दिवसा कडाक्याचे ऊन तापत असल्याने उष्णताही सहन करावी लागत आहे. शुक्रवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा १ अंश अधिक हाेते. ३३.९ अंशाची नाेंद करण्यात आली. मागील २४ तासांच्या आकड्यांवर नजर टाकल्यास विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमान १ ते ४ अंशापर्यंत घटल्याचे लक्षात येईल.