जानव्हीच्या जामिनास तात्पुरती स्थगिती

By admin | Published: March 24, 2017 02:54 AM2017-03-24T02:54:12+5:302017-03-24T02:54:12+5:30

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवरील (मणप्पुरम गोल्ड लोन)

Temporary suspension for Janni | जानव्हीच्या जामिनास तात्पुरती स्थगिती

जानव्हीच्या जामिनास तात्पुरती स्थगिती

Next

मणप्पुरम गोल्ड दरोडा प्रकरण
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवरील (मणप्पुरम गोल्ड लोन) दरोड्यातील मास्टर मार्इंड व बिहार येथील कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंगची याची पत्नी जान्हवी जामीन आदेशाला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.
जान्हवी सुबोध सिंग (३५) रा. चिस्तीपूर नालंदा बिहार हिला २१ मार्च रोजी सशर्त जामीन मंजूर केला होता. दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मदत केल्याचा जान्हवीवर आरोप आहे. तिला १ नोव्हेंबर २०१६ रोजी जरीपटका पोलिसांनी चंडी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने अटक केली होती. याच गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी सूरजसिंग ऊर्फ सन्नी सुशीलकुमारसिंग (२१) रा. आदलवाडी हाजीपूर बिहार आणि धरमवीरकुमार ऊर्फ मुकेशप्रसाद ऊर्फ मुकेशकुमार ऊर्फ बाबा धुरखेलीप्रसाद ऊर्फ नागेश्वरप्रसाद (४०) रा. चिस्तीपूर यांना २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पश्चिम बंगालच्या बराकपूर जिल्हा कारागृहातून जरीपटका पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते.
दरोड्याची घटना नारा रोडवरील कुकरेजा कॉम्प्लेक्सस्थित मणप्पुरम गोल्ड लोन कार्यालयात २८ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली होती. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ९ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ३० किलो ९०६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ लाख १ हजार २०२ रुपये रोख, असा एकूण ९ कोटी ३३ लाख १ हजार २०२ रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. जानव्ही हिने दिलेल्या कबुलीवरून दरोड्याचा हा गुन्हा सुबोधसिंग ऊर्फ अभिषेक ईश्वरीप्रसादसिंग (३५) रा. चिस्तीपूर, धरमवीरकुमार, मिथलेशकुमार ऊर्फ बल्ली मुसाफीर यादव (३१) रा. कंधूपिपर, मनिषसिंग राजारामसिंग (२४) रा. हसरगंज, रोशन मिथिलेश प्रसाद (३०) रा. मदुराई बिहार, पुल्लूसिंग ऊर्फ राजीवसिंग अमरिंदरसिंग (३५) रा.शेखोपूर, सूरजसिंग आणि रंजन यादव (४०) रा. कादरीगंज बिहार यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
दरोड्यानंतर मुख्य सूत्रधार सुबोध सिंग हा लुटीच्या मालासह आपल्या घरी गेला होता. त्याने दरोड्याची माहिती आपली पत्नी जानव्हीला दिली होती. परंतु जानव्हीने ही माहिती पोलिसांना न देता गुन्हेगारी कट रचून आरोपींना फरार होण्यास मदत केली . त्यामुळे तिला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
जानव्ही ही नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना तिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो २१ मार्च रोजी न्यायालयाने तो मंजूर करून जानव्हीला सशर्त जामीन दिला होता. दरोड्याचा हा गुन्हा गंभीर असून आरोपी जान्हवीला फरार आरोपींबाबत संपूर्ण माहिती आहे. ही माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे, तपास अपुरा आहे. त्यामुळे जान्हवीच्या जामीन आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयात आव्हान करता यावे, यासाठी तिचा जामीन तात्पुरता स्थगित करण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सी. एम. बहादुरे हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Temporary suspension for Janni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.