अस्थायी कर्मचारी देशव्यापी आंदोलन करणार
By Admin | Published: April 15, 2017 02:17 AM2017-04-15T02:17:06+5:302017-04-15T02:17:06+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जीवन विमा निगमच्या (एलआयसी) अस्थायी कर्मचाऱ्यांनी
भारतीय आयुर्विमा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शपथ
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जीवन विमा निगमच्या (एलआयसी) अस्थायी कर्मचाऱ्यांनी आ. डॉ. मिलिंद माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाची शपथ घेतली.
एलआयसीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना सर्र्वोच्च न्यायालयात २६ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एक एक शब्दाचे पालन एलआयसीच्या व्यवस्थापनाने करावे आणि त्यावर अंमलबजावणी करावी, यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांना तीन सूत्रात बांधले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या त्यांच्या तिन्ही सूत्रांचा आम्ही अवलंब केला आहे. बी.एन.पी. श्रीवास्तव आणि राजेश निंबाळकर यांनी न्याय मिळवून देण्यासाठी २६ वर्ष संघर्ष केला. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आम्हाला न्याय मिळाला.
बाबासाहेबांना अभिवादन करताना एलआयसी अस्थायी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष कैलास भोयरकर, सचिव कल्याण नाईक, प्रदीप तिरपुडे, गजानन जोशी, शैलेश बावरिया, किशोर माथने, रवी बागडे, पुरुषोत्तम गणवीर, शरद आदमने, जनार्धन चौधरी, रेखा मेश्राम, सरोज सांगोळे, सुरेखा जंगले, विद्या रामटेके, लक्ष्मी बोंदुले, उषा मानवटकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)