सेल्फी काढताना धाकट्याचा पाय घसरला.. त्याला पकडताना मोठाही जलाशयात पडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 11:50 AM2021-08-16T11:50:46+5:302021-08-16T12:18:07+5:30

Nagpur News स्वातंत्र्य दिनाला गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी गेलेल्या उमरेड येथील भावंडाना गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी मिळाली. (fond of selfie)

The temptation to take selfies is on the soul; Two brothers were buried in Gosekhurd reservoir | सेल्फी काढताना धाकट्याचा पाय घसरला.. त्याला पकडताना मोठाही जलाशयात पडला...

सेल्फी काढताना धाकट्याचा पाय घसरला.. त्याला पकडताना मोठाही जलाशयात पडला...

Next
ठळक मुद्देएकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू


नागपूर : स्वातंत्र्य दिनाला गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी गेलेल्या उमरेड येथील भावंडाना गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी मिळाली. रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास ही हृद्य हेलावून सोडणारी घटना घडली. मंगेश मधुकर जुनघरे (३५) आणि त्याचा लहान भाऊ विनोद उर्फ लल्ला जुनघरे (३१, रा. मोहपा रोड, उमरेड, जि. नागपूर) अशी मृतक भावंडाची नावे आहेत.

गोसेखुर्द जलाशयातील पॉवर हाऊस लगतच्या किनाऱ्यावरील ही घटना आहे. रविवारी मंगेश धाकट्या भावासोबत दुपारी १ वाजताच्या सुमारास पवनी (जि. भंडारा) लगतच्या गोसेखुर्द धरण बघावयास दुचाकीने निघाले. याठिकाणी बंदोबस्त असल्याने आणि धरणाकडे जाण्याचा मार्गच बंद करण्यात आल्यामुळे ते परतीच्या मार्गावर होते. अशातच त्यांना पॉवर हाऊसकडे गर्दी दिसून येत असल्याने जाण्याचा मोह झाला.


जलाशयातील पॉवर हाऊस लगतच्या किनाऱ्यावर धाकटा भाऊ विनोद याने मोबाईल काढत सेल्फी काढण्यासाठी गेला. दोघेही हा सेल्फीचा आनंददायी क्षण टिपत असतानाच विनोदचा पाय घसरला. क्षणार्धात मंगेशने विनोदचा हात पकडला खरा परंतु दोघांचाही तोल गेला. अन्य एकाने दोघांनाही वाचविण्यासाठी हात पुढे केला परंतु त्याआधीच दोघेही जलाशयात वाहून गेले.


मंगेश स्वस्त धान्य दुकान चालवायचा. त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. विनोदने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला पुणे येथे नौकरी सुद्धा होती. लॉकडाऊनमुळे विनोद ‘वर्क फॉर्म होम’ याकारणाने घरीच वास्तव्याला होता.  दोन वर्षापूर्वी विनोदचे लग्न झाले असून त्याला ८ महिन्याची तान्हुली आहे. दोन्ही भावंडे सुस्वभावी आणि लाडके होते. दोघांच्याही निधनामुळे कुटुंबाला आघात झाला असून या संपूर्ण घटनाक्रमामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मंगेशचा  मृतदेह सापडला 
गोसेखुर्द जलाशयात घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस, गोसेखुर्द जलायशाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोघांचाही सायंकाळी उशीरापर्यंत शोध घेण्यात आला. मृतदेह सापडले नाही. अखेरिस सोमवारी पुन्हा सकाळपासूनच शोधमोहिम सुरू झाली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास मंगेश जुनघरे याचा मृतदेह मिळाला. विनोदचा शोध सुरू आहे.

Web Title: The temptation to take selfies is on the soul; Two brothers were buried in Gosekhurd reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू