नागपुरात दहा विमानांना उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:28 AM2019-06-01T00:28:11+5:302019-06-01T00:29:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली.
नागपूर विमानतळाच्या वेळेच्या तक्त्यानुसार पहाटे ४.१० वाजता येणारे एअर अरेबियाचे शारजाह विमान २३ मिनिटे उशिरा अर्थात पहाटे ४.३३ वाजता आले. या विमानाने २७ मिनिटे उशिरा उड्डाण भरले. तसेच कतार एअरवेजच्या विमान २५ मिनिटे उशिरा सकाळी ६.२५ वाजता उडाले.
याशिवाय देशांतर्गत एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान सकाळी ७.२० ऐवजी १.२५ तास उशिरा ८.४५ वाजता, एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान १५ मिनिटे उशिरा सकाळी ७.५५ वाजता, इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ७.४५ ऐवजी १ तास ८ मिनिटे उशिरा अर्थात ८.५३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान सकाळी १५ मिनिटे उशिरा सकाळी ८.५० वाजता, इंडिगोचे दिल्ली-नागपूर १७ मिनिटे उशिरा सकाळी ८.५७ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान सायंकाळी ५.२५ ऐवजी ५४ मिनिटे उशिरा ६.१९ वाजता, गो एअरचे मुंबई-नागपूर विमान २० मिनिटे उशिरा सायंकाळी ६.४५ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान १६ मिनिटे उशिरा रात्री ९.११ वाजता आणि गो एअरचे बेंगळुरू-नागपूर विमान रात्री ११.४५ ऐवजी ३८ मिनिटे विलंबाने रात्री १२.२३ वाजता पोहोचले. त्यामुळे नागपुरातून देशाच्या अन्य भागात जाणाऱ्या सात विमानांनी उशिरा उड्डाण भरले.