Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील दहा हजारावर पोस्टर, बॅनर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:02 PM2019-09-26T22:02:39+5:302019-09-26T22:04:56+5:30
आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रशासनातर्फे पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून बाराही विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत १० हजारांवर राजकीय पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रशासनातर्फे पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून बाराही विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत १० हजारांवर राजकीय पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी २१ तारखेपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय तसेच खासगी कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, घरांवरील राजकीय व्यक्तींचे पोस्टर, बॅनर काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे.
प्रशासनाने १० हजारावर पोस्टर, बॅनर काढले. शासकीय इमारतीवरील १९२३, सार्वजनिक इमारतीवरील ४९७६ तर खासगी इमारतींवरून तीन हजारांवर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. नागपूर शहरात ५२८ तर ग्रामीण भागातील २७२६ पोस्टर, बॅनर काढण्यात आले. हिंगणा मतदार संघात सर्वाधिक १४०० वर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. तर सर्वात कमी सात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून काढण्यात आले.