नागपुरातील काशीनगर येथे बाजार हटविण्यावरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:14 AM2020-02-18T00:14:10+5:302020-02-18T00:15:56+5:30
रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली. याची माहिती मिळताच पसिरातील रहिवासी महिला व नागरिक घटनास्थळी जमा झाले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक व बाजारात दुकान लावणाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात अजनी पोलिसात तक्रार दाखल केली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्तीत भरणाऱ्या अनधिकृ त बाजारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. घरापुढे दुकाने लावली जातात. रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विक्रेते बसून असतात. यामुळे रहदारीला अडथळा होतो. यासंदर्भात महापालिका कार्यालय, प्रभागातील नगरसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मात्र काही दिवसापूर्वी महापालिकेने प्रथमच अनधिकृत बाजारांच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानुसार काशीनगर, सम्राट अशोक कॉलनी निवासी कृती समिती व बुद्ध विहार समितीने त्यांच्या वस्तीत भरणारा आठवडी बाजार गेल्या सोमवारी लागू दिला नाही. दुसऱ्याआठवड्यात सोमवारी पुन्हा बाजार लावण्याला विरोध के ला. याला दुकान लावणाऱ्या महिलांनी विरोध केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.