‘एम्स’ वसतिगृहाच्या ताब्याला घेऊन ताणतणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:18 PM2018-06-14T22:18:07+5:302018-06-14T22:18:19+5:30

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहेत. ‘एम्स’ एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु या वसतिगृहात दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने खोल्यांच्या हस्तांतरणाला घेऊन गुरुवारी ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले.

Tension on the AIIMS hostel | ‘एम्स’ वसतिगृहाच्या ताब्याला घेऊन ताणतणाव

‘एम्स’ वसतिगृहाच्या ताब्याला घेऊन ताणतणाव

Next
ठळक मुद्देशासकीय दंत महाविद्यालयाचे वसतिगृह : तूर्तास १८ खोल्यांचे एम्सकडे हस्तांतरण


लोकमत न्यूज  नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहेत. ‘एम्स’ एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु या वसतिगृहात दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने खोल्यांच्या हस्तांतरणाला घेऊन गुरुवारी ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वसतिगृहाच्या १८ खोल्यांचा ताबा ‘एम्स’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला, यामुळे हे प्रकरण तूर्तास शांत झाले असलेतरी उर्वरित खोल्यांवरून तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिहानमधील २५२ एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘एम्स’च्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. याला पूर्ण व्हायला सुमारे चार वर्षांचा कार्यकाळ लागणार आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत ‘एम्स’च्या एमबीबीएसचे वर्ग मेडिकल महाविद्यालयात भरणार आहेत. ‘एमबीबीएस’ च्या ५० जागांवर जुलै २०१८ पासून प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे मागील महिन्यातच ठरले होते. त्यानुसार आज गुरुवारी वसतिगृह ताब्यात घेण्यावरून बैठक घेण्यात आली. यात ‘एम्स’चे समन्वयक अधिकारी डॉ. विरल कामदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, शासकीय दंत महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर व एम्सचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार बक्षी उपस्थित होते. बैठकीत ३६ खोल्यांच्या या वसतिगृहातील १८ खोल्यांमध्ये शासकीय दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी राहत असल्याच्या विषयाला घेऊन ताण वाढला. अखेर मधला मार्ग काढीत उर्वरित १८ खोल्या ‘एम्स’कडे हस्तांतरीत करण्याच्या आणि एका खोलीमध्ये दोन विद्यार्थी असे एकूण ३६ विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था या वसतिगृहात करण्याचे ठरले. उर्वरित १४ विद्यार्थ्यांची व्यवस्था नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रानुसार, ‘एम्स’चे विद्यार्थी एकाच वसतिगृहात ठेवण्याला घेऊन अधिकाºयांचा जोर होता. परंतु मुले आणि मुली एकत्र कसे ठेवता येईल व आता मुले आणि मुलांची संख्या हाती नसल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
दंत महाविद्यालयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये रोष
दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवे वसतिगृह बांधण्यात आले. ३६ खोल्यांच्या या वसतिगृहातील एका खोल्यांमध्ये तीन विद्यार्थी राहू शकतील एवढी जागा आहे. परंतु अचानक ‘एम्स’च्या ५० विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, विशेषत: पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या हे विद्यार्थी भाड्याच्या खोलीत राहत आहे.

Web Title: Tension on the AIIMS hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.