तणावामुळेही ‘इसब’ होऊ शकतो

By Admin | Published: September 26, 2014 01:15 AM2014-09-26T01:15:24+5:302014-09-26T01:15:24+5:30

‘इसब’(एक्झिमा) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ) काही अन्नपदार्थ (दूध, अंडी) लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात.

Tension can also cause eczema | तणावामुळेही ‘इसब’ होऊ शकतो

तणावामुळेही ‘इसब’ होऊ शकतो

googlenewsNext

युवकांमध्ये आढळतो हा रोग : जयेश मुखी यांची माहिती
नागपूर : ‘इसब’(एक्झिमा) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ) काही अन्नपदार्थ (दूध, अंडी) लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात. तणाव हा देखील एक घटक आहे. कोरडे हवामान आणि कोरडी त्वचा हे सुद्धा त्याला आणखी तीव्र करण्यास कारणीभूत ठरतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
त्वचेला येणाऱ्या ओल्या व कोरड्या सुजेला ‘इसब ’ (एक्झिमा) असे म्हणतात. हा विकार पुष्कळ प्रमाणात अनुवांशिक व अनेकरूपी असतो. परंतु संसर्गजन्य नसतो. लहान बाळ आणि युवा मुलांमधे तो सहसा आढळतो. मेडिकलच्या त्वचारोग विभागाचे डॉ. जयेश मुखी यांनी सांगितले, इसबामुळे त्वचा लाल होते, कोरडी पडते आणि तिच्यावर लाल चट्टे येतात. उष्णता, तणाव किंवा खाजवण्यामुळे जखमा झाल्याने तेथील कंड अधिक वाढतो. इसबचे चट्टे हे गुडघ्यांच्या मागे, कोपरांचा कोन आणि मनगट, मानेवर, घोट्यांवर आणि पायांवर बऱ्याचदा उठतात. बालकांमधे हे चट्टे गालांवर पुरळ येण्याद्वारे सुरू झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांनी हे पुरळ हातपायांवर येतात. इसब हा रोग दमा किवा उच्च ताप येण्याचा इतिहास असलेल्या लोकांमधे अधिक सहजपणे आढळतो. इसबाचा कौटुंबिक इतिहास, पिवळा ताप किंवा अन्य श्वसनाच्या अ‍ॅलर्जी असणाऱ्या लोकांमध्येदेखील इसबचे प्रमाण अधिक असते. इसब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ). काही अन्नपदार्थ लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात (दूध, अंडी). तणाव हा देखील एक घटक आहे. कोरडे हवामान आणि कोरडी त्वचा हे सुद्धा त्याला आणखी तीव्र करण्यास कारणीभूत ठरतात. (प्रतिनिधी)

Web Title: Tension can also cause eczema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.