शोभायात्रेच्या मार्गावरील अतिक्रमण हटविताना तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:21 AM2018-03-24T01:21:37+5:302018-03-24T01:21:47+5:30
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शोभायात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढले. कारवाईदरम्यान हंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात काही लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शोभायात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढले. कारवाईदरम्यान हंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात काही लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.
मेयो हॉस्पिटल-भगवाघर चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. तेथून गांजाखेत चौकाकडे जाताना नालसाब चौकात काही व्यक्तींनी कारवाईला विरोध केला. इतवारी नंगा पुतळा चौक ते गांधीपुतळा चौकातील फूटपाथवरील दुकानांचे शेड व ओटे हटविण्यात आले. त्यानंतर पथकाने गांधीपुतळा चौकातून बडकस चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविले. त्यानतंर श्याम टॉकीज चौक ते गांधीगेट शिवाजी पुतळा चौक ते महाल चौकापर्यंत फूटपाथवरील दुकानांचा सफाया केला. रस्त्यावर आलेले दुकानांचे शेड तोडले.
दुसºया पथकाने धरमपेठ झोनअंतर्गत लक्ष्मीभवन चौक ते झेंडा चौक आणि झेंडा चौक ते आरटीओ आॅफीस ते लक्ष्मीनगर तसेच रविनगर चौक ते पोलीस जिमखाना आणि जिल्हा कार्यालय परिसर आणि व्हीसीए स्टेडीयम परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई केली. कारवाईत ३४ शेड, १५ ओटे हटवून २ ट्रक साहित्य जप्त केले. सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात जमशेद अली, नितीन मंथनावर, मंजूर शाह, प्रकाश पाटील कारवाई केली.