मेट्रोच्या बुटीबोरी विस्तारीकरणात ‘टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:08+5:302021-07-08T04:07:08+5:30
वसीम कुरैशी नागपूर : मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरीपर्यंतच्या विस्तारीकरण नियोजनात जामठा जवळील जागा अधिग्रहणासंदर्भात पेच निर्माण ...
वसीम कुरैशी
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरीपर्यंतच्या विस्तारीकरण नियोजनात जामठा जवळील जागा अधिग्रहणासंदर्भात पेच निर्माण झाला आहे. मेट्रोच्या बुटीबोरी विस्तारीकरणात ‘टेन्शन’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात मेट्रोच्या नागपूर ते बुटीबोरीपर्यंतच्या विस्तारात जामठा जवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) जागेवर नवीन पेच निर्माण झाला आहे. मेट्रोच्या विस्तारीकरणासह नागपूर ते बुटीबोरीपर्यंतचा रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यासाठी दोन्ही एजन्सींची संयुक्तरीत्या गुंतवणूक होणार आहे. महामार्गावरून मेट्रो ट्रॅक जाण्याचे प्रस्तावित असल्याने मेट्रोला जागा अधिग्रहणाची जास्त गरज भासणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मेट्रो बुटीबोरी विस्तारीकरणात जामठ्याजवळ एक स्टेशन बनविणार आहे. या भागात एनएचएआयचे आरओडब्ल्यू (राईट ऑफ वे) ४५ मीटरचे आहे. यातून मेट्रो पुलाच्या पिलरसाठी जवळपास ५ मीटरची जागा द्यावी लागेल. कमी जागेतून स्टेशन व ट्रॅकसाठी मेट्रोला जागा देणे, हे एक आव्हानच आहे. जागेच्या व्यवहार्यतेसाठी सल्लागार काम करीत आहे. घोषणेनुसार हे काम सहा महिन्यात सुरू करायचे आहे. दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरीपर्यंत १८.६ किमीचे रुळ टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी इको पार्क स्टेशन, अशोक वन व बुटीबोरी एमआयडीसीमध्ये स्टेशन प्रस्तावित आहे.