Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर तणाव; ईडीच्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 01:19 PM2021-06-25T13:19:02+5:302021-06-25T13:19:55+5:30

ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Tension outside Anil Deshmukh Nagpur house protests by NCP supporters against ED raids | Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर तणाव; ईडीच्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं  

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर तणाव; ईडीच्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं  

googlenewsNext

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना (सीआरपीएफ) तैनात करण्यात आलं आहे. देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी नागपुरातील घराबाहेर ईडी आणि भाजपाविरोधात निदर्शनं केली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

नागपूर पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या कायकर्त्यांना अटक केली असून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. सकाळी ८ वाजल्यापासून नागपुरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. यावेळी अनिल देशमुख घरी नसून ते मुंबईत असल्याची माहती समोर आली आहे. देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारीचं वृत्त कळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात देशमुखांच्या घराबाहेर गर्दी केली.

ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले

कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरुन ठिय्या आंदोलन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी  देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. तरीही कार्यकर्ते मागे न हटल्यानं पोलिसांनी बळाचा वापर करुन निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: Tension outside Anil Deshmukh Nagpur house protests by NCP supporters against ED raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.