अनधिकृत अतिक्रमण हटविताना तणाव

By admin | Published: April 13, 2016 03:11 AM2016-04-13T03:11:22+5:302016-04-13T03:11:22+5:30

झिंगाबाई टाकळी येथे मंगळवारी सिवर लाईनवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविताना नासुप्रच्या पथकाला

Tension in removing unauthorized encroachment | अनधिकृत अतिक्रमण हटविताना तणाव

अनधिकृत अतिक्रमण हटविताना तणाव

Next

नासुप्रची कारवाई : झिंगाबाई टाकळी येथील अनधिकृ त बांधकाम हटविले
नागपूर : झिंगाबाई टाकळी येथे मंगळवारी सिवर लाईनवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविताना नासुप्रच्या पथकाला विरोध झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मौजा झिंगाबाई टाकळी येथील खसरा क्र. ६२/२ येथे माजी सैनिक गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे ले-आऊ ट आहे. येथील भूखंड १४ व १९ च्या मालकांनी प्लॉटच्या मागील बाजूच्या सिवर लाईनवर अनधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे सिवर लाईनवर टाक्यांचे बांधकाम करता येत नव्हते. संबंधित घरमालक बांधकाम तोडण्याला विरोध दर्शवीत होते. नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात करताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी कारवाईला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने विरोधाला न जुमानता अतिक्रमण काढण्यात आले.
तसेच उत्तर नागपुरातील बाबा दीपसिंगनगर येथील खसरा क्रमांक १३९/१ व २ येथील सार्वजनिक रस्त्यांसाठी आरक्षित असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. येथे झोपडीचे बांधकाम करण्यात आले होते. यासंदर्भात नागरिक ांनी नासुप्र कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. यासंदर्भात पोलिसातही तक्रार करण्यात आली होती. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार नासुप्रचे कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड व पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Tension in removing unauthorized encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.