इतवारीत हाॅकर्सवर कारवाईदरम्यान तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:51+5:302021-06-28T04:07:51+5:30
............................................... व्हिडीओ काॅल करून छेडछाड नागपूर : व्हिडीओ काॅल करून मुलीची छेड काढणाऱ्या आराेपीविरूद्ध गिट्टीखदान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला ...
...............................................
व्हिडीओ काॅल करून छेडछाड
नागपूर : व्हिडीओ काॅल करून मुलीची छेड काढणाऱ्या आराेपीविरूद्ध गिट्टीखदान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित २५ वर्षीय तरुणीला अज्ञात आराेपीद्वारे व्हिडीओ काॅल करून अश्लील गाेष्टी करीत हाेता. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान पाेलिसांकडे तक्रार दिली. पाेलिसांनी विनयभंग व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
:::::::::::::::::::::::::::::::::::::
विवाहितेला मारहाण
नागपूर : पावसापासून संरक्षणासाठी घराच्या छतावर टीन लावत असलेल्या विवाहितेला मारहाण करून आक्षेपार्ह वर्तन करण्याचे प्रकरण समाेर आले आहे. हुडकेश्वर येथील रहिवासी महिला २६ जून राेजी घराच्या छतावर टीनाचे शेड लावत हाेती. याचवेळी वस्तीत राहणारे आनंद कुकडे, त्याची पत्नी व शेजारी महिला पीडितेच्या घरी शिरले. त्यांनी विवाहितेला मारहाण करून आक्षेपार्ह वागणूक दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
:::::::::::::::::::::::::::::::::::::
पेट्राेल पंपावरून ७७ हजार चाेरले
नागपूर : कळमना येथील एका पेट्राेल पंपावरून ७७ हजार रुपये चाेरी गेल्याचे प्रकरण समाेर आले आहे. सूर्यानगरच्या पेट्राेल पंपावर कार्यरत कर्मचारी शुभम ठाकरेने शनिवारी दिवसभरात ग्राहकांकडून गाेळा केलेले ७७ हजार रुपये एका थैलीत ठेवले. थैली मशीनला टांगून ताे ग्राहकाकडून स्वॅप मशीनने पेट्राेल भरत हाेता. याचवेळी अज्ञात आराेपीने पैशाने भरलेली थैली गायब केली. कळमना पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा दाखल केला. पाेलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आराेपींचा शाेध घेत आहे.
:::::::::::::::::::::::::::::::::
दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू
नागपूर : पतीसह दुचाकीवर जात असलेल्या महिलेचा पडल्याने मृत्यू झाला. सूयाेगनगर येथील रहिवासी ५४ वर्षीय उर्मिला कनाेजे या पती हिरालाल यांच्यासह २५ जून राेजी दुचाकीने जात हाेती. अजनी मेट्राे स्टेशनजवळ दुचाकी कुदल्याने उर्मिला खाली पडून जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. धंताेली पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.