‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 06:17 AM2023-03-24T06:17:51+5:302023-03-24T07:16:15+5:30

गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले.

terror link : NIA raids at four places in Nagpur, Investigation of four in 'Gazwa-e-Hind' case | ‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी

‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथकाने गुरुवारी नागपूर जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ राबविल्याने खळबळ उडाली. शहरात तीन ठिकाणी तीन जणांची चौकशी करण्यात आली. तर जवळच्या कुही-मांढळमधील मोबाइल विक्रेत्याची झाडाझडती घेण्यात आली.  देशविरोधी कृत्य आणि धार्मिक कट्टरता पसरवणारे दहशतवादी मॉड्यूल ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. 

गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले. छापे पडले, त्या वेळी चाैघेही झोपले होते. एनआयए टीम आणि पोलिसांना पाहून त्यांना धक्काच बसला. झडतीत मोबाइल, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि कागदपत्रे सापडली. मोबाइल जप्त करण्यात आले. पाकिस्तानमधील संघटनांशी दोघांचे बोलणे झाले होते का, याची चाैकशी करण्यात येत आहे. 

मध्य प्रदेश, गुजरातमध्येही टाकल्या धाडी
गझवा-ए-हिंदचे बिहारमधील दहशतवादी जाळे गेल्या वर्षी उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकरणी पुढील तपासासाठी एनआयएने गुरुवारी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतही धाडी घातल्या. 
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर, गुजरात राज्यातील वलसाड, सुरत जिल्ह्यात घातलेल्या धाडींमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

कारवाईदरम्यान काही वेळ तणाव
एनआयएच्या पथकाने पहाटे चार वाजता चार संशयितांच्या घराला घेराव घातला. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना ‘अलर्ट’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते. एनआयए अधिकारी व पोलिस पाहून दोन संशयितांचे नातेवाईक संतप्त झाले. विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Web Title: terror link : NIA raids at four places in Nagpur, Investigation of four in 'Gazwa-e-Hind' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.