६५ हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची टेस्ट()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:28+5:302021-05-26T04:08:28+5:30
साखळी खंडित करण्यासाठी मनपाची मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महापालिकेतर्फे बाजारपेठा, ...
साखळी खंडित करण्यासाठी मनपाची मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महापालिकेतर्फे बाजारपेठा, बँक, ऑटोचालक, डिलिव्हरी बाय, पेपर हाॅकर्स, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्यादी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर‘ची कोरोना चाचणी मोहीम दहाही झोनमध्ये राबविली जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातर्फे एक महिन्यात ६५ हजारांहून अधिक नागरिकांची टेस्ट करण्यात आली. ३१,८१० नागरिकांची आरटी-पीसीआर, तर ३३,४०५ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनीही कोरोना टेस्ट केली जात आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या सहकार्याने डॉ. शुभम मनगटे आणि चमूकडून चाचणी माेहीम राबविली जात आहे. या कार्यात ११ मोबाइल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात येत आहे. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यत कोरोना चाचणी केली जात आहे.