व्यवसायिकांची १५ दिवसाआड कोरोना चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:38+5:302021-06-10T04:07:38+5:30
मौदा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांना पालन करायचे आहे. यासोबतच मौदा शहरातील सर्व व्यवसायिकांची ...
मौदा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांना पालन करायचे आहे. यासोबतच मौदा शहरातील सर्व व्यवसायिकांची दर १५ दिवसांनी कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांनी नगरपंचायत प्रशासनाला केल्या आहेत.
नगरपंचायत कार्यालयात बुधवारी कोविड आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मदनूरकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. खासगी दवाखान्यात उपचासाठी येणाऱ्या एखाद्या रुग्णाला कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास डॉक्टरांनी आधी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला द्यावा. यानंतर संबंधित रुग्णाचा अहवाल पाहूनच त्याच्यावर योग्य उपचार करावे असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याने मौदा शहरात लसीकरण मोहीम प्रभावी पद्धतीने राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीला तहसीलदार प्रशांत सांगडे, नगराध्यक्षा भारती सोमनाथे, न.प.चे प्रशासकीय अधिकारी राजेश सिंह परमार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, न.पं. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व व्यवसायिक उपस्थित होते.