टेस्ट फ्लाइट झाली; पण विमानाने उड्डाण घेतली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:22+5:302021-04-27T04:08:22+5:30

वसीम कुरैशी नागपूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून नादुरुस्त असलेले नागपूर फ्लाइंग क्लबचे विमान आता उड्डाण घेण्यास तयार झाले आहे; ...

Test flight over; But the plane did not take off | टेस्ट फ्लाइट झाली; पण विमानाने उड्डाण घेतली नाही

टेस्ट फ्लाइट झाली; पण विमानाने उड्डाण घेतली नाही

Next

वसीम कुरैशी

नागपूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून नादुरुस्त असलेले नागपूर फ्लाइंग क्लबचे विमान आता उड्डाण घेण्यास तयार झाले आहे; परंतु कोरोनाच्या कारणामुळे उड्डाण करण्यास निर्बंध आले आहेत. नुकताच निवड करण्यात आलेले डिप्टी चीफ फ्लाइंग इंस्ट्रक्टर व चीफ ग्राऊंड इंस्ट्रक्टर यांना नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये नियुक्तीसाठी डीजीसीएच्या समक्ष मौखिक परीक्षा द्यायची होती; परंतु कोरोनामुळे ही प्रक्रिया टाळण्यात आली.

त्यानंतरच आता क्लबला फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या मान्यतेकरिता डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)ची टीम निरीक्षण करेल. नागपूर फ्लाइंग क्लबच्या सूत्रांनी सांगितले की, मार्चमध्ये तीन विमानांची टेस्ट फ्लाइट पूर्ण झाल्यानंतर क्लबमध्ये प्रशिक्षण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी शक्यता होती; परंतु शक्य झाले नाही. उड्डाण घेण्यासाठी तयार असलेले विमान टेस्ट फ्लाइट नंतर उभे आहे.

- प्रशिक्षणार्थी प्रतीक्षेत

फ्लाइंग क्लबमधून उड्डाण बंद असल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून १८ प्रशिक्षणार्थी प्रतीक्षेत आहे. आता त्यांच्यापुढे वयाची मर्यादाही येऊ शकते. या काळात अनेकांचे लग्नही झाले आहे.

Web Title: Test flight over; But the plane did not take off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.