मनपातर्फे आता चाचणी आमचे जागी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:44+5:302021-06-18T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड-१९ या साथरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेतर्फे चाचणी आमचे जागी मोहीम हाती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ या साथरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेतर्फे चाचणी आमचे जागी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता पुढच्या तीन महिन्यात मनपा पथक शासकीय व अर्धशासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, व्यापारिक प्रतिष्ठाने इत्यादी ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांची चाचणी करतील.
महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या संकल्पनेनुसार मनपाची चमू बँका, बाजारपेठेत, आय.टी.कंपन्या, विकास कामे करणाऱ्या कंपन्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करतील. यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी त्यांना https://forms.gle/ZtRNskqbjRH3j2ai7 या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरावा लागेल. यासाठी किमान २० लोक चाचणीसाठी हवेत, चाचणीसाठी आवश्यक तेवढी जागा असावी आणि समन्वयासाठी एक व्यक्ती नेमावा, अशा अटी असून याची पूर्तता करणारे या अभियानाचा लाभ घेऊ शकतात.
मनपाच्या शहर सीमेअंतर्गत चाचणी केली जाईल. अर्जदार कंपन्या किंवा कार्यालयांना कोणत्याही एका व्यक्तीचे नांव, पत्ता, मोबाईल नंबर, लॅडलाईन नंबर आणि किती लोकांची चाचणी करायची आहे याची माहिती द्यावी लागेल. कमीत - कमी २० लोकांची चाचणी करण्यात येईल. जर संस्थानकडे कमी कर्मचारी असतील तर दुसऱ्या संस्थांना सोबत घेऊन चाचणी करू शकतात. चाचणीचा रिपोर्ट ज्या व्यक्तीचे नांव दिले आहे त्याला दिला जाईल. अधिक माहितीसाठी nmc.vaccine@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.