प्राण्यांच्या सुरक्षेसाठी महाराज बागेतील कर्मचाऱ्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:08+5:302021-05-10T04:08:08+5:30
नागपूर : देशात सिंहांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांनुसार महाराज बागेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ...
नागपूर : देशात सिंहांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांनुसार महाराज बागेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल रविवारी मिळाले असून ते निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वन्यजीव उद्यानांमध्ये आणि प्राणीसंग्रहालयांमध्ये बरीच काळजी घेतली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच्या, सिहांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तानंतर आता अधिकच गंभीरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. याअंतर्गत ७ मे रोजी महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील सर्व २७ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या धरमपेठ झोनच्या डाॅक्टरांच्या चमूने महाराजबागेत येऊन सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली होती. त्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने सूचनाही देण्यात आल्या होत्या. ४८ तासांनंतर रविवारी या सर्वांचे अहवाल मिळाले. ते पॉझिटिव्ह आल्याने येथील प्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्राप्त अहवालासंदर्भात केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे माहिती देण्यात आली आहे.