चाचण्या वाढल्या, रुग्णही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:18+5:302021-05-19T04:09:18+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरुच आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर आता रुग्णसंख्येतही ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरुच आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर आता रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ५९४८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ५८६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी १८५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १,३७,११५ इतकी झाली आहे. यातील १,२२,५०१ रुग्ण बरे झाले आहेत.
हिंगणा तालुक्यात ४६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ४, कान्होलीबारा (३), वडधामना (२) तर आसोलासावंगी, नागलवाडी, मांडवघोराड, खापरी गांधी, देवळी सावंगी, निलडोह, डिगडोह येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात १५६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मांढळ येथे ८ तर कुही व वेलतूर येथे प्रत्येकी २ रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात २६ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ९ तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ४१२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
काटोल तालुक्यात ३४७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५ तर ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत (५), कोंढाळी (२) तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात १२ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ३५ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्याला दिलासा
नरखेड तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. तालुक्यात १६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३५० तर शहरात १३५ इतकी झाली आहे. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात २, जलालखेडा (३), मेंढला (३)तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ७ रुग्णांची नोंद झाली.