निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर ठाकरे गटाने राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 09:47 PM2023-03-01T21:47:24+5:302023-03-01T21:48:08+5:30

Nagpur News ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Thackeray group should resign if they are not satisfied with the decision of Election Commission | निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर ठाकरे गटाने राजीनामा द्यावा

निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर ठाकरे गटाने राजीनामा द्यावा

googlenewsNext
ठळक मुद्दे कारागृहात राहून आल्याने राऊत यांना माफी मागण्याची सवय नाही

योगेश पांडे 
नागपूर : विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत व निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय दिला आहे. हक्कभंग समितीतदेखील शिवसेनेचे आमदार आहेत. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना नेते खा.संजय राऊत जे बोलतात त्यांना उध्दव ठाकरे यांची मान्यता असते. राऊत यांनी १२ कोटी जनतेच्या मतांचा अपमान केला आहे. हक्कभंग समिती जे कारवाई करायची ती करेल पण उध्दव ठाकरे यांनी राऊत यांच्यावर कारवाई करावी किंवा फेसबुक लाईव्ह करून भूमिका स्पष्ट करावी. संजय राऊत जे बोलले ते उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का, यावर सगळे पक्ष बोलले ते का बोलत नाही असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. तसे पाहिले तर संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. परंतु ते कारागृहात राहून आले त्यामुळे त्यांना माफी मागण्याची सवय नाही, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

Web Title: Thackeray group should resign if they are not satisfied with the decision of Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.